IIT Bombay: आयआयटी मुंबईने तयार केला ‘मेटाबॉलिक मॉनिटर’ – iit bombay develops metabolic monitor


हायलाइट्स:

  • हातपट्टी करणार आता घामातून चाचण्या
  • आयआयटी मुंबईने तयार केला ‘मेटाबॉलिक मॉनिटर’
  • लॅबमध्ये जाऊन महागड्या चाचण्या करण्याची गरज नाही
  • ‘रिपोर्ट’ तत्काळ उपलब्ध

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

तुम्हाला अॅसिडीटी झाली आहे का? किंवा तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी-जास्त झाले आहे का? यासाठी आता तुम्हाला लॅबमध्ये जाऊन महागड्या चाचण्या करण्याची गरज नाही. कारण, यासाठी आयआयटी मुंबई आणि अमेरिकेतील टर्फ विद्यापीठ यांनी एक विशिष्ट प्रकारची हातपट्टी (बॅण्डएड) तयार केली आहे. याला ‘मेटाबॉलिक मॉनिटर‘ असे नाव देण्यात आले असून, याचे ‘रिपोर्ट’ तत्काळ उपलब्ध होऊ शकणार आहेत.

आपण कोणतीही क्रिया करत असताना किंवा आपल्या शरीरात पोषक पदार्थाचा प्रवेश झाल्यापासून अखेरीस त्यापासून रासायनियक पदार्थांचे मलमूत्र आणि घामाद्वारे शरीराबाहेर उत्सर्जन होत असते. याला चयापचय क्रिया (मेटाबॉलिज्म) असे म्हणतात. अनेकदा या उत्सर्जित पदार्थांचे कण हे कमी-जास्त प्रमाणात बाहेर पडतात. परिणामी माणूस आजारी पडू शकतो. तर काही विशिष्ट आजारांमध्ये याकडे सतत लक्ष देणे आवश्यक असते. मात्र, सध्या असे लक्ष ठेवणारे कोणतेही उपकरण उपलब्ध नाही. यामुळे आपल्याला किती घाम येतो, त्याद्वारे किती मेटाबॉलिज्म शरीराबाहेर पडत आहेत. याबाबत अभ्यास करण्यासाठी वेगळ्या उपकरणांची आवश्यकता होती. यामुळे आयआयटी मुंबई आणि टर्फ विद्यापीठाने मिळून हे संशोधन केल्याचे टर्फ विद्यापीठाचे प्राध्यापक समीर सोन्कुसाळे यांनी सांगितले. या उपकरणामुळे रुग्णाला योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणेही शक्य होणार आहे.

घामामध्ये शरीरातील मेटाबॉलिकची स्थिती लक्षात येते. घामात सोडियम आयर्नची कमतरता असेल, तर अतिसार होऊ शकतो, अमोनियम आयर्नच्या प्रमाणावरून आतड्यांची कार्यक्षमता, ऑक्सीजनची पातळी आदींचा अभ्यास होत असतो. या सर्वांचा अभ्यास एकाच उपकरणाच्या माध्यमातून व्हावा या उद्देशाने संशोधक कामाला लागले. त्यांनी यासाठी एक उपकरण बनवले. या उपकरणात कार्बनचे आवरण असलेला पॉलिस्टरचा दोरा असलेले सेन्सर लावले. यामुळे याच्या माध्यमातून सोडियम आणि अमोनियम आयर्नचा अंदाज बांधता येणार आहे. तसेच यात कार्बनचे कवच असलेला स्टेन्लेस स्टीलचा दोरा बसविण्यात आला आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला अॅसिडीटी झाली आहे की नाही, हे समजू शकणार आहे. तर पॉलिस्टरचे आवरण असलेल्या दोऱ्याच्या माध्यमातून शरीरातील द्रवाची स्थिती समजू शकणार आहे.
उत्तर येत नसेल तर प्रश्नच पुन्हा लिहा! शिक्षण संचालकांचा अजब सल्ला
हे सर्व सेन्सर्स एका इलेक्ट्रॉनिक सर्किटला जोडले असून, त्याच्या माध्यमातून माहिती गोळा होणार आहे. यामुळे आपल्या शरीरातील चयापचय क्रियेत किंचितसा बदल झाला, तरी आपल्याला काही क्षणात मोबाइलवर संदेश येणार आहे. हातात किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर तो सहज वापरता यावा या उद्देशाने तो ‘बॅण्डएड’सारखा तयार करण्यात आला आहे. यामुळे तो वापरून फेकून देऊ शकतो. यातील सर्किटचा पुनर्वापर करता येतो. हे अगदी स्वस्त आणि मस्त अशा स्वरूपातील उत्पादन असल्याचे आयआयटी मुंबईचे प्रा. मार्यम शोजाई यांनी सांगितले. हे संशोधन नुकतेच जागतिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

भारतातील ५० टक्के पदवीधरही नोकरी मिळवण्यास पात्र नाहीत!

RBI मध्ये मॅनेजरसह अन्य पदांवर भरती; वेतन दरमहा ७७ हजारांवर

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *