मुख्य परीक्षा ३० जानेवारीला
जे उमेदवार आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेच्या निकालात यशस्वी ठरले आहेत, ते पुढील टप्प्यात मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ मुख्य परीक्षा २०२१चे आयोजन ३० जानेवारी रोजी केले जाणार आहे.
असा पाहा आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ पू्र्व परीक्षेचा निकाल
– संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जा.
– यानंतर आरआरबी आणि नंतर CRP-RRBs-IX शी संबंधित पर्यायावर क्लिक करा.
– नंतर नव्या पेजवर रिझल्ट लिंक क्लिक करा.
– आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरून सबमीट करा.
– आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटही घेऊन ठेवा.
दरम्यान, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की आयबीपीएसद्वारे ऑफिसर स्केल १ प्रिलीम्स परीक्षेचे केवळ स्टेटस जारी केले आहेत. स्कोअर कार्ड नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; DRDO त अप्रेंटिस भरती