HSC hall tickets: बारावी परीक्षांचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून कॉलेजांना ऑनलाइन उपलब्ध – maharashtra board exams 2021 junior colleges can download hsc hall tickets from april 3


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी (HSC Exam 2021) विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाइन पद्धतीने (Online) देण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. ही प्रवेशपत्रे शनिवारी ३ एप्रिल पासून कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. बारावीची अंतिम परीक्षा एप्रिल – मे २०२१ मध्ये होत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांनी www.mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून कॉलेजच्या लॉगइनद्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करावेत. ३ एप्रिल २०२१ पासून ही प्रवेशपत्रे कॉलेजांना डाऊनलोड करता येणार आहेत. महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाइन प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना प्रिंट करून द्यायची आहेत. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येऊ नये अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

प्रवेशपत्रे डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास महाविद्यालयांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. हॉलतिकिटात विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.

प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव यासंदर्भातील दुरुस्त्या असतील तर महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर त्या दुरुस्त करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे.

दहावी, बारावी परीक्षा: श्रेणी विषयांचा तिढा सुटला

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (ड्युप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे.

फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

बोर्ड परीक्षांची तयारी कशी कराल? हे ७ मंत्र ध्यानात ठेवा…

मुंबई विद्यापीठ पीजी परीक्षांसाठी पहिल्यांदाच देणार क्वेश्चन बँक

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *