gate result 2021: GATE Result 2021: गेट परीक्षेत १७.८२ टक्के विद्यार्थी पात्र – gate 2021 exam result announced by iit bombay


हायलाइट्स:

  • गेट परीक्षेचा निकाल जाहीर
  • १७.८२ टक्के विद्यार्थी पात्र
  • गुणपत्रिका ३० मार्च ते २० जून या कालावधीत डाऊनलोड करता येणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई
इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी आवश्यक प्रवेश प्रक्रिया ‘गेट’चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही परीक्षा यंदा आयआयटी मुंबईने आयोजित केली होती.

ही परीक्षा ६ व ७ आणि १३ व १४ फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये पार पडली होती. या परीक्षेला सुमारे सात लाख ११ हजार ५४२ विद्यार्थी बसले होते. यापैकी १७.८२ टक्के म्हणजे अवघे एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांमध्ये ९८ हजार ७३२ मुलगे; तर २८ हजार ८१ मुलींचा समावेश आहे. ही परीक्षा २७ विषयांची घेण्यात आली होती. यामध्ये यंदा पर्यावरण इंजिनीअरिंग आणि ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस या दोन नवीन विषयांचा समावेश करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ३० मार्च ते २० जून या कालावधीत डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षेनंतर प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीष चौधरी यांनी अभिनंदन केले. तसेच करोना काळात परीक्षेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजन समितीचेही त्यांनी कौतुक केले.
GATE Result 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

GATE 2021: अंतिम उत्तरतालिका जारी

MPSC Exam: आयोगाने जारी केल्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

NEET PG 2021: अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विंडो खुली

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *