gate 2021: GATE 2021: अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा उघडली – gate 2021 iit bombay reopens gate 2021 application correction window


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली आहे. ज्या उमेदवारांनी गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आपल्या अर्जात २३ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करू शकतात. यापूर्वी ही मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र पुन्हा एकदा आयआयटी मुंबईने ही करेक्शन विंडो २३ नोव्हेंबरपर्यंत उघडली आहे.

उमेदवार आपली कॅटेगरी, परीक्षा केंद्र ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटद्वारे बदलू शकतील.

कधी होणार परीक्षा?

GATE 2021 परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. GATE 2021 साठी अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ पासून उपलब्ध केले जाणार आहेत. या प्रवेश परीक्षेचा निकाल मार्च २०२१ मध्ये जारी केला जाणार आहे.

GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय – पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे.

भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी DAF-1 अर्ज जारी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: