foreign student in us: अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात १८ टक्क्यांची घट – foreign student enrolments in us dip by 18 percent


करोना महामारी आणि इमिग्रेशनसंबंधी नियमांमधील गोंधळाची स्थिती यामुळे २०२० या वर्षात अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली. एका मीडिया वृत्तानुसार. २०२० मध्ये अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण तब्बल १८ टक्क्यांनी कमी झाले.

अमेरिकेतील एफ १ किंवा एम १ व्हिसा असणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या १८ टक्क्यांनी घटली. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) विभागाच्या स्टुडंट्स आणि एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राममधील माहितीनुसार ही आकडेवारी पुढ आली आहे. देशाच्या होमलँड सिक्युरिटी विभागाच्या स्टुडंट व्हिसा मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे ही आकडेवारी नोंदवली जाते.

एफ १ व्हिसा पूर्ण वेळ अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर एम १ व्हिसा व्होकेशनल किंवा अन्य अशैक्षणिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिला जातो. ‘अमेरिकन दूतावासाने गेल्या वर्षी नियमित व्हिसा प्रोसेसिंग प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे इंटरव्ह्यू शेड्युल करता आले नाहीत,’ असं या अहवालात म्हटलं आहे. ‘अनेक आदेशांद्वारे मागील वर्षी अमेरिकेबाहेरच्या विद्यार्थ्यांवर तेथे येऊन शिकण्यात निर्बंध लादण्यात आले होते. ज्यांचे अभ्यासक्रम पुढे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले त्यांच्यासाठीही ही प्रक्रिया किचकट झाली.’ आयसीईच्या आकडेवारीत अगदी किंडरगार्टनपासून १२ वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी पदवी स्तरावरील आणि जगातल्या कानाकोपऱ्यातील आहेत.

विद्यापीठाचे साक्षांकन ऑनलाइन; परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

गेल्या वर्षी खूप दूतावास करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बंद होते. यामुळे २०२१ या वर्षाबाबत कमालीची अस्थिरता होती. १ मार्च रोजी २३३ पैकी १४३ दूतावास कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

MPSC Exam 2020: ‘सी-सॅट’चा पेपर अवघड; परीक्षा सुरळीत

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *