exams of children: मुलांची नव्हे ‘घरच्यांची’ परीक्षा; पालकांनो, या गोष्टी आवर्जून करा – tips fpr parents during exams of children


हायलाइट्स:

  • मुलांच्या वार्षिक परीक्षांचा मोसम
  • करोनामुळे सगळीच मंडळी घरातच असल्यामुळे अनेकांची अडचण
  • अभ्यास करताना विद्यार्थी आणि घरच्या मंडळींनी लक्षात ठेवा काही मुद्दे

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर

परीक्षा हा नुसता शब्द आठवला तरी अनेक गोष्टी मनात येतात. अभ्यास, सराव, ताण, तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे फक्त विद्यार्थीच नव्हे, तर पूर्ण घर परीक्षा देत असतं. त्यात दहावी, बारावी म्हणजे सगळ्यांचीच सत्वपरीक्षा. यंदाची परिस्थिती सगळ्यांसाठीच नवीन आहे. ऑनलाइन अभ्यास, परीक्षेबद्धलचा संभ्रम आणि त्यात घरातले वातावरण; एकूण काय तर, सगळंच तणाव वाढवणारे आहे.

साधारणतः अभ्यासासाठी वेळापत्रकाचे पालन, शांतता आणि तणावरहित वातावरण असे अनेक घरांमध्ये आढळून येते. पण, कोविडमुळे ते कठीण झाले आहे. घरातील सगळीच मंडळी घरातच असल्यामुळे अनेकांची अडचण होऊ लागली आहे. छोटे घर, घरातल्या इतर मंडळींचे ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा शाळा-कॉलेज, त्यात अभ्यासिकेत किंवा वाचनालयात जाणेसुद्धा कठीण किंबहुना अशक्य आहे. या सगळ्या अडचणींमुळे त्रास व ताण वाढला आहे. अशा वातावरणात खालील काही मुद्दे अभ्यास करताना विद्यार्थी आणि घरच्या मंडळींनी लक्षात ठेवावे.

० जे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देत आहेत, त्यांच्या गरजांना, अभ्यासाला प्राधान्य द्या.

० जर जागा छोटी असेल तर इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करा आणि बोलताना जमेल तेवढ्या हळू आवाजात बोला.

० तुमच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांना सांगून ठेवा की तुमच्या घरी तुमचे भाऊ, बहीण किंवा मुलं बोर्डाच्या परीक्षेसाठी बसणार आहेत, म्हणजे त्यांना तुमची अडचण समजेल.

घोकंपट्टी नव्हे व्यवहार्य ज्ञान; CBSE बोर्डाचा नवा मूल्यांकन आराखडा

० विद्यार्थ्यांनीही वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे आणि असलेल्या वेळेत आणि परिस्थितीत अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा.

० अभ्यासासाठी पहाटेची वेळ केव्हाही चांगली. शांत वातावरणात अभ्यास चांगला होतो आणि लक्षातही राहतो; कोणाचाही आवाज नसतो किंवा अडचण नसते. तसेच कोणाच्या कामाच्या मध्ये व्यत्यय येत नाही.

बोर्ड परीक्षांची तयारी कशी कराल? हे ७ मंत्र ध्यानात ठेवा…

० काही विद्यार्थी रात्रभर अभ्यास करतात (किंवा त्यांना ती वेळ जमते); पण असे करताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य प्रमाणात झोप महत्त्वाची आहे, हे ध्यानात ठेवा.

० तुमच्या शेजारी विद्यार्थी किंवा घरातून काम करणारी मंडळी नसतील, तर त्यांना त्यांच्या घरी (सर्व खबरदारी आणि नियम पाळून) अभ्यास करण्याची परवानगी विचारू शकता.

० (सर्व खबरदारी आणि नियम पाळून) गच्ची, बाल्कनी किंवा बाग असेल तर त्यांचाही वापर करू शकता; पण अभ्यासाकडे लक्ष केंद्रित राहील याची खबरदारी घ्या.

हा काळ सगळ्यांनी समजून घेऊन, एकमेकांना मदत करण्याचा आहे. परीक्षा जरी एकाची असली तरी तयारी आणि मदत पूर्ण घराला करावी लागते.

परीक्षेसाठी शुभेच्छा !
दहावी, बारावी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात अशक्य: शिक्षणमंत्री

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *