engineering admissions 2020-21: थेट द्वित्तीय वर्ष पदविका इंजिनीअरिंगच्या प्रवेशांना मुदतवाढ – dte extended date for direct second year engineering diploma admissions 2020-21


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या थेट द्वित्तीय वर्ष पदविका इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना आता शनिवार, २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर अंतिम गुणवत्ता यादी २९ नोव्हेंबरला वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांमधील थेट द्वित्तीय वर्ष इंजिनीअरिंग पदविका व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १७ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. परंतु, करोनाचा प्रभाव आणि कॉलेजे बंद असल्याने विद्यार्थ्यांचा यंदा या प्रवेश प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २४ नोव्हेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीमध्ये तक्रार असल्यास विद्यार्थ्यांना २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत तक्रार नोंदविता येईल. तसेच अंतिम गुणवत्ता यादी २९ नोव्हेंबरला जाहीर होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: