DRDO Jobs: डीआरडीओत अप्रेंटिस भरती; दहावी उत्तीर्णांना संधी – drdo jobs dmrl recruitment 2021 drdo invites application for apprentice posts


हायलाइट्स:

  • डीआरडीओत अप्रेंटिस भरती
  • दहावी उत्तीर्णांना संधी
  • अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च

DRDO-DMRL Recruitment 2021: डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (Defence Research & Development Organization, DRDO) ने आयटीआय अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत डीआरडीओ एकूण ३० पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यात फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट बुक बाइंडर सहित अन्य पदांचा समावेश आहे. या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च आहे.

रिक्त पदांचा तपशील

फिटर- ०६,
टर्नर- ०६,
मशीनिस्ट- ०७,
वेल्डर- ०२
इलेक्ट्रीशियन- ०१
इलेक्ट्रॉनिक्स- ०१
बुक बाइंडर- ०१
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट- ०७

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

डीआरडीओने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणारे इच्छुक आणि योग्य उमेदवार डीआरडीओ जॉब नोटिफिकेशन २०२१ साठी ३१ मार्च २०२१ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. उमेवारांना दहावीची मार्कशीट, आयटीआय प्रमाणपत्रासह अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची स्कॅन केलेल्या छायाप्रतींसह अर्ज करायचे आहेत. उमेदवारांना admin@dmrl.drdo.in या ईमेल आयडीवर मेल करायचा आहे. कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहाते, ते विषयात सुस्पष्टपणे नमूद करायचे आहे.

दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी; रिझर्व्ह बँकेत भरती

उदाहरणार्थ, फिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अप्रेंटिससाठी अर्ज करायचा आसेल तर मेलच्या सब्जेक्ट लाइन मध्ये अप्रेंटिस भरतीअंतर्गत फिटर पदासाठी अर्ज असं नमूद करावं लागेल. याव्यतिरिक्त उम्मीदवारांना हा सल्ला दिला जातो की ते आपला ईमेल अधूनमधून नियमितपणे तपासावा. अर्जाशिवाय जमा केलेले ईमेल स्वीकारले जाणार नाहीत.

सारस्वत बँकेत क्लर्क भरती; कॉमर्स, मॅनेजमेंट पदवीधरांना संधी

महावितरणमध्ये ७ हजार जागांवर जम्बो भरती; बारावी उत्तीर्णांना संधी

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *