प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकही या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. उमेदवार आपला अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील.
यापूर्वी परीक्षा देशात ११२ शहरांमध्ये होणार होती, पण आता ती १३५ शहरांमध्ये होणार आहे. गेल्यावर्षी ही परीक्षा ५ जुलै रोजी आयोजित होणार होती, पण करोना व्हायरस महामारीमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. सीटीईटी परीक्षेचे वर्षातून दोन वेळा आयोजन करण्यात येते. यापैकी एक परीक्षा जुलै महिन्यात तर दुसऱ्यांदा परीक्षा डिसेंबर महिन्यात होते.
CTET January परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक
सीटीईटी पेपर पॅटर्न
पेपर १ मध्ये १५० गुणांचे १५० प्रश्न विचारले जातील. यात चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडगॉजी, लँग्वेज १, लँग्वेज २, गणित आणि पर्यावरण अभ्यासाशी संबंधितत ३०-३० प्रश्न विचारले जातील.
पेपर २ मध्ये १५० गुणांचे १५० प्रश्न असतील. यात चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडगॉजी, लँग्वेज १, लँग्वेज २, गणित आणि विज्ञानाशी (गणित, विज्ञानाच्या शिक्षकांसाठी) किंवा सोशल स्टडीज / सोशल सायन्स (सोशल स्टडीज / सोशल सायन्सच्या शिक्षकांसाठी) संबंधित प्रश्न विचारले जातील,