cs exam postponed: ICSI CS Exam 2021: कंपनी सेक्रेटरी परीक्षा लांबणीवर – icsi cs june 2021 exam postponed for foundation and executive courses


हायलाइट्स:

  • कंपनी सेक्रेटरी परीक्षा लांबणीवर
  • १ जून २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होत्या परीक्षा
  • कोविड-१९ स्थितीचा आढावा घेतल्यानंतर नव्या तारखा होणार जाहीर

ICSI CS Exam June 2021: कोविड-१९ मुळे कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने आपली वेबसाइट icsi.edu वर सीएस जून २०२१ परीक्षा स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन (CS Foundation) आणि एक्झिक्युटिव्ह (CS Executive) प्रोग्राम्स (ओल्ड और न्यू सिलेबस) साठी या परीक्षा १ जून २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. आयसीएसआयने कळवले आहे की परीक्षांच्या सुधारित तारखा कोविड – १९ संक्रमणाच्या ताज्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केल्या जातील.

संस्थेने कळवले आहे की परीक्षा सुरू होण्याच्या किमान ३० दिवस अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची (ICSI CS June 2021 Exam Schedule) माहिती देण्यात येईल. लेटेस्ट अपडेट्ससाठी ऑफिशियल वेबसाइट icsi.edu ला नियमितपणे भेट देत राहा असं आवाहन देखील आयसीएसआयने केलं आहे.

JEE Main: जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षाही लांबणीवर
UPSC Jobs 2021: कंबाइंड मेडिकल सर्विस परीक्षा नोटिफिकेशन; बदलली ही तारीख

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *