credit limit for online courses: ऑनलाइन शिक्षणाला ४० टक्के क्रेडिट; UGC चा निर्णय – ugc doubles credit limit for online courses from 20 percent to 40 percent


हायलाइट्स:

  • ‘ऑनलाइन’ शिक्षणाचे क्रेडिट दुप्पट करण्याचा यूजीसीचा निर्णय
  • ‘ऑनलाइन’ला ४० टक्के क्रेडिट
  • विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वर्षभर करोनाच्या सावटाखाली जगत असताना ऑनलाइन शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच ऑनलाइन व ऑफलाइन याचा मेळ असलेल्या संकरित शिक्षण पद्धतीचा उगम होऊ पाहत आहे. याच दृष्टीने एक पाऊल म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने आता ४० टक्के क्रेडिट हे ऑनलाइन शिक्षणाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबबातचे राजपत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

उच्च शिक्षणात आतापर्यंत वीस टक्के क्रेडिट हे ऑनलाइन शिक्षणाला देण्यात येत होते. मात्र, आता ते ४० टक्के इतके करण्यात येणार आहे. याबाबत मागील वर्षापासून चर्चा सुरू होती. यानंतर अखेर याबाबतचे राजपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यासाठी ‘तरुणांसाठी सक्रिय वेबआधारित ऑनलाइन अभ्यासक्रम श्रेयांक मार्गदर्शक अधिनियम २०२१’ प्रसिद्ध केला आहे. या ऑनलाइन क्रेडिटचे अभ्यासक्रमही नियमित शैक्षणिक वर्षातील सत्र समाप्तीच्या जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यातच समाप्त होणार आहेत.

याचबरोबर ‘स्वयम’ पोर्टलवर अभ्यासक्रम उपलब्ध करणाऱ्या संस्थांकडून या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही केले जाणार असून त्यांना श्रेणी देण्यात येणार आहेत. विद्यापीठांना एका विद्यार्थ्याला एका सत्राला ४० टक्के क्रेडिट घेण्याचीच परवानगी देता येणार असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या श्रेयांकाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रिया विद्यापीठांच्या विद्वत परिषदांनी निश्चित कराव्यात, अशी सूचनाही यात करण्यात आली आहे.

हेही वाचा: राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई विद्यापीठ पीजी परीक्षांसाठी पहिल्यांदाच देणार क्वेश्चन बँक

विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार

विद्यार्थ्यांनी यामध्ये कोणते अभ्यासक्रम शिकावेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कॉलेजने प्राध्यापकांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही यामध्ये करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार असून, त्यांना अधिक चांगले आणि चाकोरीबाहेरचे शिक्षण घेता येणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
CBSE बोर्डाचा नववी ते बारावीचा नवा अभ्यासक्रम जाहीर

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *