Covid 19 Vaccine Updates Britain Approves Astrazeneca Oxford Covid 19 Vaccine For Use


लंडन: कोरोना लस निर्मिती कंपनी AstraZeneca-Oxford च्या लसीच्या वापराला ब्रिटनमध्ये मंजुरी मिळाली असून आता त्याचा वापर लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे. AstraZeneca-Oxford या लसीच्या वापराला मंजुरी देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. ही मंजुरी ब्रिटनच्या मेडिसिन्स अॅन्ड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA)ने दिली आहे.

ब्रिटनच्या मेडिसिन अॅन्ड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA)ने या लसीच्या वापाराला मंजुरी दिली याचा अर्थ ही लस वापरण्यास सुरक्षित आणि प्रभावी आहे. तज्ञांनी केलेल्या कठोर क्लिनिकल चाचण्या आणि आकडेवारीचे संपूर्ण विश्लेषण या अनुषंगानं केलं गेले आहे. या लसीने सुरक्षितता, गुणवत्ता आणि प्रभावीपणाचे कठोर मानकं पाळले आहेत.

भारतात या लसीचे उत्पादन पुण्याची सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया करत आहे. ब्रिटनच्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञानं सांगितलं की AstraZeneca-Oxford ही लस गेम चेंजर असेल. त्यांच्या मते या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर काही आठवड्यातच कोरोनापासून सुरक्षा प्राप्त केली जाऊ शकते.

ब्रिटनने दिली 10 कोटी डोसची ऑर्डर

ब्रिटनने कोरोना लसीच्या एकूण 10 कोटी डोसची ऑर्डर दिल्याचं समजतंय. त्यापैकी चार कोटी डोस हे मार्च 2021 पर्यंत उपलब्ध होऊ शकतील. ब्रिटनमध्ये नुकतंच कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडलाय. हा नवा स्ट्रेन मूळच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय.

नव्या स्ट्रेनवरही उपयुक्त

AstraZeneca चे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियाट यांनी सांगितलं की कोरोनावर या लसीची उपयुक्तता अपेक्षेपेक्षाही जास्त आहे, कोरोनावर मात करण्यासाठी कंपनीला विनिंग फॉर्म्युला सापडला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही ही लस उपयुक्त होईल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.

AstraZeneca-Oxford लस लसीकरणात महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ही लस स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उत्पादित करणं सोपं आहे. तसेच ही लस फ्रीजमध्ये साठवली जाऊ शकते.

भारतात मात्र प्रतिक्षा

ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला मंजुरी मिळाली असली तरी भारतात मात्र या कंपनीला अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं दिसतंय. भारतात अद्याप कोणत्याही लसीच्या वापराला मंजुरी मिळाली नाही.

पहा व्हिडिओ: COVID-19 Vaccine : ऑक्सफर्डच्या AstraZeneca लशीला ब्रिटनमध्ये मान्यता, भारतात मात्र प्रतीक्षा

संबंधित बातम्या:

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *