Covid 19 Taking Coronavirus Lightly Can Be Dangerous In Future Get To Know | Corona Warning


मुंबई : कोरोना व्हायरसचा (CoronaVirus) फैलाव मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्णांची दैनंदिन संख्या 500 पेक्षा कमी होती, आता कोरोना रूग्णांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. विशेषत: मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झाल्यानंतर रुग्णणसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील झालं आणि कोरोनाचा ताप पुन्हा वाढला. मुंबईत सर्वसामान्यांसाठी पूर्णवेळ लोकल सुरु करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच कोरोनाच्या वाढलेल्या रुग्णसंख्येनं लोकल सुरु करण्याबाबतच्यया निर्णयावर पुन्हा प्रश्ननचिन्ह उभं राहत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती काय?

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 20,64,278 वर गेली आहे. तर, मृतांचा आकडा 51,529 वर पोहोचला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 19,75,603 झाली आहे. राज्यात 35,965 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

गेल्या १० दिवसांतील मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या

645–14 फेब्रुवारी

529–13 फेब्रुवारी

519–12 फेब्रुवारी

510–11 फेब्रुवारी

558–10 फेब्रुवारी

375–9 फेब्रुवारी

399–8 फेब्रुवारी

448–7 फेब्रुवारी

414–6 फेब्रुवारी

415–5 फेब्रुवारी

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 314076 वर पोहोचली आहे. तर आजवर एकूण 11419 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 5068 सक्रिय कोरोनारुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशा परिस्थितीत मुंबईकर मात्र कोरोनाला हरवल्याच्या थाटात वावरताना दिसत आहेत.

नाकातोंडावरुन घसरलेला मास्क आणि नावालाही न उरलेलं सोशल डिस्टंसींग हेच चित्र सगळीकडे आहे. सुरुवातीला कोरोनाची असलेली भीती आता संपत चाललीय. मात्र, कोरोनाचं गांभीर्य अजूनही ठेवलं नाही त,र मात्र अनलॉक महागात पडू शकेल हे नक्की.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार

महापालिका प्रशासनाचं म्हणणं काय?

लोकल सर्वसामान्यांसाठीसुरू केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली अस एकमेव कारण आहे असं म्हणता येणार नाही. हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मोजक्या शहरातून किंवा मोजक्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत्या, पण त्यांची संख्याही वाढलेली आहे. प्रवासीयांची RTPCR चाचणीही करण्यात येत आहे. स्थानिक स्तरावर सुरुवातीला ४ राज्यातील चाचण्या करण्यात येत होत्या, आता ५ राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांच्या कोरोना चाचण्या आपण करत आहोत. लोकल प्रवाश्यांची संख्या वाढतेय, त्याच सोबत सगळ्यांनी मास्क लावणं, अंतर राखणं अत्यंत गरजेचं आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

तरच आपण सुरक्षित….

सध्यातरी लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात चर्चा नसली तरीही ही शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं संभाव्य संकट टाळण्यासाठी आखून दिलेल्या कार्यक्रमाचं, नियमांचं पालन केलं तरच या आजारापासून आपण सुरक्षित राहू शकतो.

Corona Alert | कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांचे संकेत

जवळपास १५ दिवसाचा कालावधी कोरोना रुग्णसंख्येच्या निरिक्षणासाठी ठेवण्यात आला आहे. तो २१ – २२ तारखेला संपेल. त्या दरम्यान आम्ही पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊन नंतर सर्व सामान्यांच्या लोकल प्रवासाचा निर्णय होईल. मुंबई महानगर पालिका आणि आजूबाजूच्या महानगर पालिका विचारात घ्याव्या लागतील आणि नंतर त्या संदर्भातील शिफारस, मुद्दे राज्यशासनाला उपलब्ध करून देऊ, त्यानंतर निर्णय घेता येईल. याव्यतिरिक्त मुंबईतील शाळा- महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय एक आठवड्यात होऊ शकेल असंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *