Coronavirus updates | देशात कोरोनाचा कहर, एकाच दिवसात सापडले 89 हजारांहून जास्त रुग्ण
नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. रोज कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा नवीन विक्रम करताना दिसत आहे. शुक्रवारी देशात गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येची म्हणजे 89 हजारांहून जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या चोवीस तासात 89,129 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 714 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 44,202 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 92,605 कोरोनाचे रुग्ण सापडले होते.

देशातील आजची कोरोनाची स्थिती

एकूण कोरोना रुग्ण- एक कोटी 23 लाख 92 हजार 260
एकूण बरे झालेले रुग्ण- एक कोटी 15 लाख 69 हजार 241
एकूण सक्रीय रुग्ण- 6,58,909
एकूण मृत्यू- 1,64,110
एकूण लसीकरण- सात कोटी 30 लाख 54 हजार 295

कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतोय. राज्यात शुक्रवारी तब्बल 47 हजार 827 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, परिस्थिती आणखी बिघडली तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

शुक्रवारी महाराष्ट्रात नवीन 24 हजार 126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 24,57,494 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,89,832 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, दादरा नगर हवेली, लद्दाख, लक्षद्वीप, मिजोरम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा या ठिकाणी कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही.

महत्वाच्या बातम्या :

देशभरात कोरोनाची दुसरी लाट असेल मात्र दिल्लीत चौथी लाट : अरविंद केजरीवाल

Coronavirus Vaccine | पहिला डोस कोविशिल्ड, दुसरा कोव्हॅक्सिनचा; मंत्री संजय बनसोडे यांचे गंभीर आरोप

Pune Lockdown : पुणेकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका! पुण्यात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *