Coronavirus Mumbai News Mumbai No Mask Fines Collected Rs 46 Lakh From 22,976 In One Day


मुंबई : कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘बिना मास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे व अधिक व्यापकतेने करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात 22 फेब्रुवारी रोजी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. मुंबईत एकूण 22 हजार 976 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यानुसार महानगरपालिकेद्वारे 14606 व्यक्तींवर, मुंबई पोलिस दलाद्वारे 7911 व्यक्तींवर, मध्य रेल्वेद्वारे 238 व्यक्तींवर, पश्चिम रेल्वेद्वारे 221 व्यक्तींवर अशारितीने एकूण 22976 व्यक्तींवर बिना मास्क विषयक कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी रुपये 200 यानुसार एकूण रुपये 45 लाख 95 हजार 200 एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सातत्यपूर्ण व अधिक प्रभावी कारवाई आहे.

22 फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान महापालिकेच्या ‘एल’ विभागात सर्वाधिक म्हणजे 875 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्याकडून एक लाख 75 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. ‘आर मध्य’ विभागात 819 जणांकडून एक लाख 63 हजार 800 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम अन् लग्न समारंभातूनच कोरोना वाढला; बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती

मुंबईत विनामास्क फिरल्यास 1000 रुपये दंड शुद्ध अफवा, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण

मुंबईत विनामास्क फिरल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल अशा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. मात्र मुंबई विनामास्क आढळल्यास केवळ 200 दंड आकारला जाईल, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं की, “प्रिय मुंबईकरांनो! फेकन्यूज पसरवणारे परत आले आहेत! यावेळी ते विनामास्क असल्यास तुम्हाला 1000 दंड भरावा लागू शकतो असा दावा करत आहेत. कोणत्याही पैशातून सुरक्षिततेशी केलेल्या तडजोडीची भरपाई केली जाऊ शकत नाही. मात्र मास्क न वापरल्यास 200 रुपयांचा दंड भरावा लागेल.”

राज्यात खरंच कोरोना आहे की, फार्मास्यूटीकल कंपन्यांसाठी काही विशेष बाब? बाळा नांदगावकरांचा शासनाच्या भूमिकेवर संशय

BMC Mayor in Dadar Market | दादर भाजी मार्केटमध्ये महापौरांकडून मास्क वाटप, महापौरांचं मिशन मास्क!

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *