Coronavirus India Latest Updates Corona 23 FebruaryCoronavirus India: देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 10 हजार 584 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच सोमवारी एकूण 78 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय की देशात आतापर्यंत एक कोटी 17 लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

एक लाख 56 हजार 463 लोकांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संबंधीची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सांगण्यात आलंय की आतापर्यंत एक कोटी दहा लाख 16 हजार 434 लोकांना कोरोना झाला आहे. त्यामध्ये जवळपास एक लाख 56 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटत असून ती आता एक लाख 47 हजार 306 इतकी झाली आहे.

राज्यात खरंच कोरोना आहे की, फार्मास्यूटीकल कंपन्यांसाठी काही विशेष बाब? बाळा नांदगावकरांचा शासनाच्या भूमिकेवर संशय

कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या आता एक कोटी 12 हजार 665 इतकी झाली असून आतापर्यंत देशात एक कोटी 17 लाख 45 हजार 552 लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनाचे बरे होण्याचे प्रमाण हे 97.22 टक्के आहे तर मृत्यू दर हा 1.42 टक्के आहे.

केवळ सहा राज्यांत 90 टक्के कोरोना रुग्ण

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. भारतात सध्या 1.36 टक्के इतके रुग्ण सक्रिय आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि जम्मू कश्मीर या सहा राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अलिकडे वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी 90 टक्के रुग्ण केवळ या सहा राज्यांत आहेत. त्यामुळे या सहा राज्यांतील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ते मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत.

कोरोनाचे आकडे वाढताहेत! महत्वाच्या शहरात बेड्सची स्थिती काय? जाणून घ्या..

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *