Coronavirus Cases In India 3 May 2021 368000 New Covid-19 Cases 3417 Deaths Reported In Last 24 Hours


India Corona Case Updates : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात तीन लाख 68 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लाख 732 रुग्ण उचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील आजची कोरोना स्थिती :  

एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 99 लाख 25 हजार 604
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 62 लाख 93 हजार 003
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 34 लाख 13 हजार 642
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 18 हजार 959
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 71 लाख 98 हजार 207 डोस

रविवारच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्या आज कमी दिसून आली आहे. रविवारी भारतात 3,92,488 नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिसून आली होती. तर 3689 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच 3,07,865 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

वॅक्सिनेशची सुरुवात 

16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली होती. 30 एप्रिलपर्यंत देशभरात 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर काल 27 लाख 44 हजार 485 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व लोकांचं लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला होता. आता 1 मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

रविवारी राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान, 51,356 रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. काल तब्बल 56 हजार 647 रुग्णांचे निदान झाले. तर 51, 356 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 39,81,658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.31% एवढा झाला आहे. तर आज राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झाले. दरम्यान काल 669 कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,76,52,758 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 47,22,401 (17.08 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,96,946 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 27,735 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *