Corona Vaccination : मुंबईत एक लाख लसींचा साठा दाखल होणार; उद्या लसीकरण सुरु राहणार
मुंबई : कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुमारे 1 लाख लसींचा साठा आज सायंकाळी देण्यात आला असून तो रात्री उशीरापर्यंत मुंबईत दाखल होईल. उद्या 5 मे रोजी सकाळी हा साठा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील शासकीय व महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत 45 वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.
45 वर्ष व त्यावरील वयोगटामध्ये पहिली व दुसरी अशी दोन्ही मात्रा पात्र नागरिकांना देण्यात येईल. मात्र, यामध्ये पहिली मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना कोविन अॅपमध्ये नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. तर दुसरी मात्रा घेण्यासाठी थेट येणाऱ्या नागरिकांनाही लस देण्यात येईल. पहिली व दुसरी अशा दोन्ही मात्रांसाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना 80 टक्के नोंदणीकृत तर 20 टक्के थेट येणारे नागरिक यांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही विभागणी निश्चित करण्यात आली आहे.
दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट
दरम्यान,18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरु असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित 5 लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 500 नागरिक याप्रमाणे, उद्या देखील सकाळी 9 ते 5 या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ  दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.
चांगली बातमी! राज्यात आज पुन्हा नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांचा आकडा जास्त
लसीकरण केंद्राची नावे
सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
AP Coronavirus Strain | धडकी भरवणारी बातमी, कोरोनाचा नवीन म्युटेंट ‘N440K’ इतर स्ट्रेनपेक्षा 10 पट अधिक संसर्गजन्य
Author: admin
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *