Corona update, state recorded 59907 corona infected patients today | Corona Update


मुंबई : राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज  59 हजार 907 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 30 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. 

राज्यात 322 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 56 हजार 652 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36 टक्के  झाले आहे.

राज्यात काल 55 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.  

मुंबईत पल्स पोलिओच्या धर्तीवर कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यासाठी पालिकेची तयारी- इक्बाल सिंह चहल

मुंबईत 10 हजार 428 रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात  10 हजार 428 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6007 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 88 हजार 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 81 हजार 886 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 35 दिवस झाला आहे.

Mask Mandatory | वाहन चालवतेवेळी एकटं असतानाही मास्कचा वापर बंधनकारक; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश 

राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *