Corona outbreak New Corona guidelines for Pune | Pune corona Guidelines


Pune corona Guidelines : मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता आता कठोर पावलं उचलण्याचा इशारा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तूर्तास पुण्यात कोरोनाचे रुग्ण पाहता रुग्णसंख्या वाढ ही प्रशासनापुढं उभी असणारी मोठी अडचण ठरत आहे. याच धर्तीवर सध्या लॉकडाऊन लागू केला नसला तरीही पुण्यात काही निर्बंध मात्र लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं काही सेवांवर याचा परिणाम होणार आहे. 

नव्या नियमावलीनुसार काय सुरु, काय बंद? 

1 एप्रिलपासून  सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश 

शाळा-महाविद्यालयं 30  एप्रिलपर्यंत बंद राहतील.

मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम अनिवार्य 

सार्वजनिक बस वाहतूक सुरू 

लग्न समारंभात फक्त 50 लोकांचीच उपस्थिती

अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच परवानगी 

सार्वजनिक उद्यानं, बागबगीचे फक्त सकाळच्याच वेळेत सुरू 

उपहारगृह, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु राहतील 

… तर लॉकडाऊन अटळ 
अजित पवार यांनी दिलेल्या माहतीनुसार 2 एप्रिलला पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. इच्छा नसली तरीही येत्या पाच सहा दिवसात अशीच रुग्णवाढ होत राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. 

Maharashtra Holi Guidelines: सावधान! धुलिवंदन-रंगपंचमीसाठी पर्यटनस्थळी गेलात तर कारवाई होणार

लसीकरण केंद्राची संख्या दुपटीनं वाढवणार
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता सध्या 50 टक्के खाजगी रुग्णालयाचे बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. परिस्थिती गंभीर असून आता नाईलाजास्ताव कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्र  दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *