Corona | देशातील ‘या’ 7 राज्यांमध्ये सुरुये कोरोनाचा कहर


नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी भारतात आलेली कोरोनाची लाट कुठे नियंत्रणात येण्याचं चिन्हं दिसत असतानाच आता पुन्हा एकदा या विषाणूच्या संसर्गानं डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी देशात 25 हजारहून अधिक रुग्णसंख्या आढळली. मागील 84 दिवसांमध्ये आढळलेला हा रुग्णांचा सर्वात मोठा आकडा ठरला. ज्यामुळं देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,13,59,048 वर पोहोचला. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील 7 राज्यांमध्ये देशाच्या आकडेवारीच्या तुलनेत जवळपास 87.73 नवे रुग्ण हे मागील 24 तासांमध्ये आढळून आले. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा चिंताजनक पद्धतीने वाढत असल्यामुळे राज्यातही प्रशासनाकडून पुन्हा एकदा काही महत्त्वाची पावलं उचलण्यात सुरुवात करण्यात आली आहे. 

थकीत वीज बिल भरा, महावितरण विभागाकडून ग्राहकांना संगीतातून साकडं

सध्याच्या घडीला देशातील 3 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 2.10 लाखांच्याही पलीकडे गेला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि केरळचा समावेश आहे. देशातील रुग्णसंख्येशी तुलना केली असता ही रुग्णसंख्या टक्के इतकी आहे. 

आतापर्यंत एकूण 1,09,89,897 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मागील 24 तासांमध्येही 16,637 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

या भागात मागील 24 तासांत एकही कोरोना मृत्यू नाही 

14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नाही. यामध्ये राजस्थान, झारखंड, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, मेघालय, दमण आणि दिव, दादरा नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, लडाख, मणिपूर, मिझोराम अंदमान निकोबार द्विप समुह यांचा समावेश आहे. Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *