College reopening: कॉलेजला जायचंय? पालकांचे संमतीपत्र आणा! – colleges asking parents consent from students to come to college


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ज्युनिअर कॉलेजांची तयारी सुरू झाली असून, कॉलेजमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पालकांचे संमतीपत्र गरजेचे असल्याची माहिती कॉलेजांमार्फत देण्यात आली.

मार्च महिन्यापासून बंद असलेली शाळा-कॉलेजेस सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे आता ज्युनिअर कॉलेजमध्ये आजपासून तयारी सुरू केली जाणर आहे. वर्ग-खोल्यांचे सॅनिटायझेशन, सॅनिटायझरची व्यवस्था यासह सुरक्षित वावरचे पालन करून बेंच ठेवणे यासारखी तयारी आजपासून केली जाणार असल्याची माहिती कॉलेजांमार्फत देण्यात आली. तसेच कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला पालकांचे संमतीपत्र असेल तरच प्रवेश दिला जाणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. पालकांच्या संमतीविना कोणत्याही विद्यार्थ्याला वर्गात बसून देण्याची सूचना सरकारमार्फतच करण्यात आली आहे. याचसोबत दररोज वर्ग पन्नास टक्के क्षमतेने भरविले जाणार असून, सायन्स, मॅथेमॅटिक्स आणि इंग्रजी या विषयांना प्राधान्य देऊन, दररोज केवळ चार तासिका घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्के असली, तरी शिक्षक व शिक्षकेतरांची उपस्थिती मात्र १०० टक्के असणार आहे.

सुप्रीम कोर्टामार्फत मराठा आरक्षण प्रश्नावर कोणताही निर्णय झालेला नसल्याने अद्यापही अकरावी प्रवेशाचा पेच सुटलेला नाही. त्यामुळे अकरावीचे वर्ग सध्या ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. परंतु, आता सरकारच्या सूचनेनुसार बारावीचे वर्ग मात्र भरविले जाणार आहेत. याबाबत आयुक्तांसोबत बैठक झाली असून, बैठकीतील सूचनेनुसार कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती प्राचार्यांमार्फत देण्यात आली.

शाळांकडून पालकांच्या बँक खात्याची तपासणी!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: