CLAT 2021: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) साठी अर्ज करण्यास मुदतवाढ – clat 2021 common law admission test application date extended


हायलाइट्स:

  • CLAT 2021 परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ
  • ३० एप्रिल पर्यत अर्ज करता येणार
  • परीक्षा १३ जून रोजी

सामायिक विधी प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी आता ३० एप्रिल पर्यत अर्ज करू शकणार आहेत. अर्जांसाठी तब्बल एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार consortiumofnlus.ac.in या कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (CNLU) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतो. CLAT परीक्षा १३ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या कालावधीत होणार आहे.

कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार CLAT 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांची मुदत ३० एप्रिल २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी ही मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपत होती. क्लॅट परीक्षा ही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे किंवा जे २०२१ मध्ये परीक्षा देणार आहेत, असे विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांना बारावीत ४५ टक्के (आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के) गुण असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी LLM अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना LLB ला ४५ टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

SSC: कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती; दहावी उत्तीर्णांना संधी
MPSC पूर्व परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की जारी

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *