मुंबई : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यलयीन वेळेत बदला करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यानंतर पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत.
गट अ व गट ब वर्गातील अधिकारी 100 टक्के तर गट क व गट ड उपस्थित 50 % राहतील. 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील तर 25 टक्के कर्मचारी 11 ते 5 या कालावधीत कार्यालयात असतील. उर्वरीत क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील मात्र ज्यावेळी तातडीची आवश्यकता असल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकतात. जे कर्माचारी वर्क फ्रॉम होम करणा आहेत ते फोनवर उपलब्ध असणार आहे.
कार्यालयीन गट अ आणि गट ब वर्गातील अधिकारी 100 टक्के
गट क व गट ड 50 % कर्मचारी उपस्थित राहणार. त्यापैकी 25 टक्के सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत तर 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत उपस्थित राहतील.
क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आरोग्य तपासणी
मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या :