cet exam 2021: सीईटी परीक्षांचे वेळापत्रक गडबडणार? – cet exam 2021 uncertainty over maharashtra 12th board exam, cet time table likely to disrupt


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आयटी कंपनी निवडण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन मागविणे, परीक्षांचे आयोजन आणि निकाल जाहीर करणे अशा संपूर्ण प्रक्रियेला उशीर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यातील पदवी, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलद्वारे वेगवेगळ्या सीईटी परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी २६ मार्चला टेंडर काढण्यात आले. मात्र, यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली असून, आता १४ मे ही कंपनी निवडण्याची अंतिम तारीख राहणार आहे. कंपनी निवडल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज कधी मागवणार, कधी परीक्षा होणार आणि कधी निकाल जाहीर होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सीईटी सेलमार्फत साधारण १५ सीईटी परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एमबीए परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा मार्चमध्येच घेतली जाते. यंदा अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू न झाल्याने; तसेच काहींचे निकाल जाहीर न झाल्याने ही परीक्षाही पुढे ढकलल्याचे चित्र आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. या परीक्षेसाठी चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी नोंदणी करतात. या परीक्षेसाठी देशभरातील सर्व परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षांचे नियोजन पाहून या नऊ दिवसांचे नियोजन सीईटी सेलला करावे लागते. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून नियोजन दर वर्षी केले जाते. करोनामुळे यंदा बारावीची परीक्षा जूनमध्ये महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘सीईटी’देखील पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सीईटी परीक्षेला तीन लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

NEET 2021: नीट परीक्षेची तारीखही बदलण्याची शक्यता

NEET PG 2021 परीक्षा चार महिन्यांसाठी लांबणीवर

विद्यार्थी-पालक चिंताग्रस्त

गेल्या वर्षी एमबीए सीईटी वगळता इतर सीईटी परीक्षा उशिराने झाल्या. त्यामुळे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले आहे. यंदा सर्व सीईटी परीक्षांचे नियोजन रेंगाळल्यास एमएचटी सीईटीसह अन्य सीईटींच्या तारखांचे नियोजन करणे सीईटी सेलच्या यंत्रणेला अवघड होणार आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास सीईटी सेलच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सीईटी सेलकडून आगामी परीक्षांच्या आयोजनाबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढत आहे.

‘जीपमॅट’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *