central railway recruitment 2021: मध्य रेल्वेत वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती – central railway recruitment 2021 walk in interview for different posts


Central Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी नामी संधी आहे. सेंट्रल रेल्वेच्या भायखळा डिव्हिजनमध्ये सिनीयर रेसिडेंट पदावर भरती सुरू आहे. वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने उमेदवारांना थेट भरतीसाठी मुलाखत द्यायची आहे. इच्छुक उमेदवार ६ जानेवारी २०२१ रोजी थेट वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्शित राहू शकतात.

Central Railway Recruitment 2021: रिक्त पदांबाबतची अधिक माहिती

ईएनटी ENT – १ पद

जनरल सर्जरी – १ पद

गायनॅकोलॉजिस्ट अँड ऑब्सटेट्रिशियन – १ पद

ऑप्थल्मोलॉजी – १ पद

जनरल मेडिसिन – १ पद

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / पदव्युत्तर पदवीधारक असावेत. एमडी / डीएनबी /
एमएस / डीएनबी किंवा डिप्लोमा किंवा डिग्री असावी.

नवीन वर्षांत केंद्र सरकारी नोकरीची संधी; हजारो रिक्त पदे

वयोमर्यादा

मध्य रेल्वे भरती २०२१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४० वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी ६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्रांसह डॉ. बी.ए.एम हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर कार्यालय, सेंट्रल रेल्वे, भायखळा (पूर्व) – मुंबई २७ येथे होणाऱ्या वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावे.

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ECGC मध्ये भरती

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *