Central Railway Recruitment 2020: मध्य रेल्वेत पॅरामेडिकल स्टाफची भरती – central railway recruitment 2020 apply for 48 nurse, technician and other paramedical staff posts


Central Railway Recruitment 2020: मध्य रेल्वेने कंत्राटी तत्वावर पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर केली जात आहे. या भरतीचे नोटिफिकेशन २६ ऑगस्ट २०२० रोजी जारी झाले आहे. ईमेलद्वारे अर्ज करण्याची अखेरची मुदत २ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे.

पदांची माहिती –


स्टाफ नर्स – २६
फार्मासिस्ट – ०३
लॅब टेक्निशिअन – १०
एक्स-रे टेक्निशिअन – ०९
एकूण – ४८

भरती प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या ई-मेलद्वारे persbrbsl@gmail.com वर अर्ज करायचे आहेत. सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या पीडीएफ स्वरुपातील स्कॅन केलेल्या प्रती जोडायच्या आहेत. हे अर्ज २ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करायचे आहेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मुलाखती व्हॉट्स अॅप / स्काइपद्वारे रेकॉर्डेड कॉन्फरन्सद्वारे घेतल्या जातील. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उमेदवारांना दिलेल्या स्लॉटमध्ये मुलाखत घेतली जाईल आणि त्या आधारे निवड होईल.

ही भरती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आहेत. ही भरती ३१ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा तीन महिने कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने उमेदवार भरण्यासाठी होणार आहे.

निवड झाल्यावर, रुजू होताना उमेदवारांना सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावी लागतील. वरील सर्व पदे आपत्कालीन काळातील कंत्राटी स्वरुपातील आहेत, कायमस्वरुपी नाहीत.

अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करावे.

पॅरामेडिकल स्टाफच्या वरील कंत्राटी भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *