CDAC: सीडॅकच्या परीक्षेवरून वाद; ऑनलाइननंतर पुन्हा ऑफलाइन परीक्षा! – cdac pg diploma exam chaos c-dac announces fresh entrance test after putting out ranking list


हायलाइट्स:

  • सीडॅकच्या परीक्षेवरून वाद
  • ‘ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कम्प्युटर शिक्षणात अग्रगण्य असलेल्या सरकारमान्य सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंगने (सीडॅक) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पुन्हा ही प्रवेश परीक्षाा ऑफलाइन आयोजित करण्याची सूचना जाहीर केली आहे. याला परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

‘सीडॅक’चा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे हे कम्प्युटर क्षेत्रात उत्तम दर्जाचे मानले जाते. यामुळे संस्थेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी चुरस पाहावयास मिळते. यंदा कोव्हिडच्या काळातही या परीक्षेला १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सीडॅकने प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन आयोजित केली होती. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना नेटवर्कची अडचण आली तर अनेकांनी गैरप्रकार केल्याचे समारे आले. यामुळे सीडॅकने पुन्हा या परीक्षेचे ऑनलाइन आयोजन केले. त्यातही अशा तक्रारी आल्यानंतर आता ही परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असल्याचे सीडॅकने जाहीर केले. प्रत्यक्षात सीडॅकने फेब्रुवारी महिन्यात निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर केली. यानुसार १३ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना त्यांचे कॉलेजचे पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी अर्ज करीत असताना अचानक संस्थेने पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हे चुकीचे असल्याचे मत ‘महाराष्ट्र स्टुडंट वेल्फेअर असोशिएशन’चे अध्यक्ष वैभव एडके यांनी व्यक्त केले. तसेच, त्यांनी या संदर्भात सीडॅकला पत्रही लिहले. या परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामाही दिला आहे. आता पुन्हा परीक्षा दिल्यावर त्यांचे नाव गुणवत्ता यादीत आले नाही तर त्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ही परीक्षा रद्द करू नये, अशी मागणीही त्यांनी केली. जर याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे एडके यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या हितासाठीच

उद्योग क्षेत्रात संस्थेचे चांगले नाव आहे. संस्थेची प्रवेश प्रक्रिया अगदी पारदर्शक असते. अशा वेळी जर यात गैरप्रकार झाले असतील तर संस्थेची विश्वासार्हता कमी होऊ शकेल. यामुळे आम्ही पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सीडॅकचे कार्यकारी संचालक ए. के. नाथ यांनी सांगितले. आधीच्या परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, तो विद्यार्थी हिताचाच आहे. नवीन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून, दोन दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
गो-विज्ञान परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या; यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश
CBSE बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सांगितले नियम… कोणते ते जाणून घ्या

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *