career news News : शाळा करताहेत विद्यार्थ्यांची माहिती ‘लीक’!! – schools to face action if students’ data is leaked, warns scert


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

विविध कंपन्या तसेच अॅप आपली माहिती इतर कंपन्यांना विकत असल्याचे प्रकार उघड होत असतानाच आता काही शाळांनीही असाच प्रकार केल्याची बाब समोर आली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची घेतलेली वैयक्तिक माहिती शाळांकडून खासगी संस्थांना देण्यात आल्याचे प्रकरण पालकांच्या लक्षात आले आहे.

पालकांनी राज्य सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) यांच्याकडे तक्रार केली आहे. याची दखल घेत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळांनी बाह्य एजन्सींना माहिती पुरविल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सर्व माध्यमांच्या शाळांना याची माहिती देण्याची सूचना परिषदेने विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजांकडून ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी शाळा महागड्या शैक्षणिक अॅपचा वापर करत आहेत. याकरिता पालकांकडून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती मागवून घेण्यात आली आहे. परंतू ही माहिती काही शाळांनी खासगी संस्था, कोचिंग संस्था आणि कॉलेजे यांना पुरविण्यात येत असल्याच्या तक्रारी राज्य सरकार आणि सीबीएससीकडे पालकांनी केल्या आहेत. पालकांच्या तक्रारींनंतर शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याची दखल घेत विद्यार्थ्यांची माहिती सामायिक करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिक्षकांची आजपासून होणार कोविड चाचणी

राष्ट्रीय स्तरावर ‘वन नेशन, वन प्लॅटफॉर्म’ अंतर्गत दीक्षा अॅपचा वापर करण्याबाबत शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांना आवश्‍यक सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यादृष्टीने विद्यार्थी हिताचा विचार करता दीक्षा अॅपचा वापर संपूर्ण राज्यामध्ये करणे अपेक्षित असल्याचेही परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही शैक्षणिक प्राधिकरण असल्याने परिषदेने मान्यता दिलेलेच शैक्षणिक अॅप किंवा शैक्षणिक साहित्य वापरावे, अशा सूचना संचालकांनी दिल्या आहेत. तसेच परिषदेच्या मान्यतेशिवाय वैयक्तिक हितासाठी असे कोणतेही साहित्य वापरण्यात किंवा प्रसारित करण्यात येऊ नये, अशी सूचना सर्व माध्यमाच्या शाळांना देण्याबाबत विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

‘या’ राज्यात २१ नोव्हेंबरपासून शाळा सुरू; SOP जारी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: