career news News : टिलिमिली शैक्षणिक मालिकेचे पुढील भाग १ सप्टेंबरपासून – tilimili educational series on dd sahyadri channel further episodes from 1st september


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनतर्फे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर चालविण्यात येत असलेल्या ‘टिलीमिली‘ या शैक्षणिक मालिकेचे पुढील भाग मंगळवार १ सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहेत. यामध्ये पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित भागांचा समावेश असेल.

इयत्ता ५ वी ते ८ वी च्या अर्ध्या वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित भाग दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहेत. पुण्यात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मालिकेचे चित्रीकरण दिनांक १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळात बंद ठेवावे लागल्याने मालिकेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला होता. मंगळवार, १ सप्टेंबर २०२० पासून १ ली ते ४ थी चे पहिल्या अर्ध्या वर्षाच्या अभ्यासक्रमावरील १९२ भाग प्रसारित करण्यात येणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येकी एक तासात पाच मिनिटांच्या मध्यांतरासह त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील.

या शैक्षणिक महामालिकेस राज्यभरातून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुमारे दीड कोटी विद्यार्थी या मालिकेचा लाभ घेत आहेत, अशी माहिती एमकेसीएलतर्फे देण्यात आली.

९वी ते १२ वीचे विद्यार्थी २१ सप्टेंबरपासून शाळेत येऊ शकतील; पण…

वेळापत्रक

मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२० ते सोमवार, २८ सप्टेंबर २०२०
इयत्ता चौथी – वेळ -सकाळी ७.३० ते ८.३०

इयत्ता तिसरी – सकाळी ९ ते १०.००

इयत्ता दुसरी -सकाळी १० ते ११.००

इयत्ता पहिली – सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *