ca november 2020 exam: CA November 2020 Exam: ३१ हजारांवर विद्यार्थ्यांनी निवडला ‘ऑप्ट आऊट’ पर्याय – icai ca november 2020 exam: over 31k aspirants opt-out of exam, to take it next year


ICAI CA November 2020 Exam: सुमारे ३१,५०० विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय निवडला आहे. एकूण ४.७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सीए परीक्षा शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी होत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने गुरुवारी सीए परीक्षांच्या जानेवारी आणि फेब्रुवारी सायकलच्या तारखांची घोषणा केली.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने जानेवारीत अतिरिक्त संधी दिली आहे. एकूण ४.७ उमेदवारांपैकी दोन-तृतीयांश विद्यार्थ्यांनी जानेवारीतील परीक्षेचा पर्याय निवडला आहे. उर्वरित ११,६८७ विद्यार्थ्यांनी मे सत्रातली परीक्षेचा पर्याय निवडला आहे. गुरुवारी ICAI ने अतिरिक्त सत्र २१ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल अशी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्ट आऊट पर्यायाची निवड करण्यापूर्वी वेळापत्रकाची मागणी केली होती त्यांच्यासाठी आयसीएआयने हा दिलासा दिला आहे.

दरम्यान, शनिवारी २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सीए फाउंडेशन किंवा सीए इंटरमिडीएट या सीए फायनल परीक्षांच्या दरम्यान स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लक्षण आहेत, ते परीक्षेला बसल्यास अन्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो, त्यामुळे असे विद्यार्थी सीए एक्झाम ऑप्ट आऊट योजना २०२०-२१ अंतर्गत जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. मात्र त्यांना सेल्फ-डिक्लेरेशन द्यावे लागेल.

कोविड योद्ध्यांच्या मुलांना मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात आरक्षण

सीए परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे –

ICAI ची ऑप्ट आऊट योजनेसंदर्भातील नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सीए नोव्हेंबर २०२० परीक्षेच्या SOP संदर्भातील नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

MAT 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; २१ नोव्हेंबरला परीक्षा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: