ca january 2021 exam: CA January Exam 2021: सीए परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी – ca january 2021 exam foundation intermediate(ipc), intermediate, final exam admit card released


CA Admit Card 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA January 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता icaiexam.icai.org असा आहे.

सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट किंवा फायनल प्रोग्रामसाठी जानेवारी सत्रातील परीक्षा होत आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर लॉग इन करून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यावे. आयसीएआयने अॅडमिट कार्डसोबत अंडरटेकिंगही घेत आहे. अल्पवयीन उमेदवारांना हे सांगायचे आहे की ते जानेवारी २०२१ ची परीक्षा त्यांच्या पालकांच्या परवानगीने देत आहेत. या अर्जांवर पालकांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. यावर उमेदवार परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकासमोर सही करतील. ही परीक्षा २१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होत आहे.

अंडरटेकिंग फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सीए फाउंडेशन, इंटर आणि फायनल परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

CLAT 2021: बदलली परीक्षेची तारीख, नवे वेळापत्रक जाणून घ्या…

पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा –

– आयसीएआयचं अधिकृत संकेतस्थळ icaiexam.icai.org वर जा.
– लॉगइन / रजिस्टर पर्यायावर क्लिक करा.
– विचारलेली माहिती भरा.
– आता तुमचे अॅडमिट कार्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ते काळजीपूर्वक वाचा.
– अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट काढून ठेवा.

लोकल सेवेखेरीज कॉलेजे उघडणे अशक्यच

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *