Bollywood Actress Nikita dutta Infected With CoronaVirus


मुंबई : गेल्या काही दिवसात अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. कालच अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. आज ‘द बिग बुल’ चित्रपटामध्ये अभिषेक बच्चनची  नायिका अभिनेत्री निकिता दत्ता हिचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

निकिताला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देताना तिच्या प्रवक्त्याने सांगितले की, निकिताला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. तिची तब्येत  आधीपेक्षा चांगली आहे. निकिता होम क्वॉरंटाईन आहे आणि डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्वत:ची काळजी घेत आहे.  निकिता ‘रॉकेट गँग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच तिला कोरोनाची लागण झाली आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटातील नायक अभिनेता आदित्य सील या सिनेमा हिरो आहे. या चित्रपटाने दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध कोरिओग्राफर जोडी बॉस्को-सीझर फेम बॉस्को करत आहे. दिग्दर्शक म्हणून बॉस्कोचा हा पहिलाच चित्रपट आहे.

‘द बिग बुल’ सिनेमा शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिषेक बच्चन सिनेमात हर्षद मेहताची भूमिका साकारत आहे. त निकीत त्याच्या पत्नीची भूमिक साकारत आहे. येत्या गुरुवारी हा सिनेमा डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 

Katrina Kaif Corona Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढतोय, अभिनेत्री कतरिना कैफ पॉझिटिव्ह

2012 मध्ये मिस इंडिया फायनलिस्ट असलेली निकिता दत्ताने 2014 मध्ये ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर, ती ‘मस्का’ आणि ‘कबीर सिंह’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त निकिताने ‘ड्रीम गर्ल’, ‘एक दूजे के वास्ते’ ‘अष्टा’ ‘एक लडकी दिवानी सी’, ‘लाल इश्क’ यासारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण

गेल्या काही दिवसात कतरिना कैफ, अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक आदित्य नारायण पत्नी श्वेता अगरवाल, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, कॉमेडीयन कुणाल कामरा, शशांक खेतान, मनोज बाजपेयी, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *