bfa counselling: बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स: कॅप राउंडचे वेळापत्रक जारी – mht cet 2020 bfa counselling date and time released at mahacet.org, check details


महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2020 चे काऊन्सेलिंग शेड्युल सीईटी कक्षाने जारी केले आहे. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (BFA) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे वेळापत्रक सीईटी कक्षाने mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. ज्या उमेदवारांना BFA कोर्ससाठी कॅप राउंडसाठी नोंदणी करायची आहे, ते या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. ही प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे.

MHT CET 2020 BFA Counselling CAP साठी नोंदणीची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२० आहे. कागदपत्रांची ई-पडताळणी ७ आणि ११ डिसेंबर रोजी होणार आहे. अंतिम यादी १४ डिसेंबर रोजी जाहीर होईल. mahacet.org वर १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांना यादी पाहता येईल.

हरकती घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ११.५९ पर्यंतचा वेळ आहे. अधिक माहिती आणि वेळापत्रकासाठी उमेदवारांनी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

mht cet 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी? वाचा सविस्तर

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *