Attacks on Nanded Sikhs Strict police security in Nanded Gurdwara area on the backdrop of Mohalla program religious places in the district closed | शीख धर्मियांच्या हल्ला


नांदेड : शीख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी हल्ला मोहल्ला हल्लाबोल हा कार्यक्रम घेण्यात येतो. सदर धार्मिक कार्यक्रमाची वर्षानुवर्षाची धार्मिक परंपरा शीख बांधवांच्या वतीने अनेक वर्षांपासून जोपासल्या जाते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 4 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावला आहे.

दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी हल्ला – मोहल्ला, हल्लाबोल कार्यक्रमासाठी देशविदेशातून शीख भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्यामुळे हल्लाबोल कार्यक्रमास शीख धर्मीयांत विशेष महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन आहे. गेल्या 300 वर्षांपासून हल्ला मोहल्ला, हल्लाबोल या धार्मिक कार्यक्रमाची परंपरा आहे.

दरम्यान गेल्यावर्षी लॉकडाऊन कालावधीत धार्मिक कार्यक्रमावर बंदी असताना सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात 200 ते 250 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान हल्ला मोहल्ला कार्यक्रमाच्या पाश्वभूमीवर गुरुद्वारा परिसरात आज नांदेड पोलीस प्रधासनाच्यावतीने कडक सुरक्षेसह बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु आज होणाऱ्या या कार्यक्रमात फक्त धार्मिक विधी व पूजा अर्चना करण्यात येणार असून गुरुद्वारा ठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदर सिंग बुंगई यांनी केले आहे. 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *