Amid The High Risk Of Coronavirus Centre To Set Up 581 PSA Oxygen Plants Across India Says Union Minister Nitin Gadkari | Oxygen Plant : ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राकडून देशभरात उभारले जाणार 581 PSA प्लांट


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात जवळपास 581 Pressure Swing Adsorption (PSA)  मेडिकल ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. NHAI आणि रस्ते वाहतू मंत्रालयाच्या वतीनं हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

‘आमचे इंजिनिअर डॉक्टरांशी समन्वयानं काम करत गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सुविधा पोहोचवण्याची जबाबदारी घेतील. प्रत्येक भारतीयाचा जीव वाचवण्यासाठी विक्रमी वेगानं ही व्यवस्था करण्यात येईल’, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी विश्वास दिला. 

Corona Advisory : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या निरोगी प्रवाशांना आरटीपीसीआरची सक्ती नको, ICMR च्या सूचना 

सध्याच्या घडीला दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. असं असतानाच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडाही मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. हीच परिस्थिती पाहता केंद्रानं राजधानी दिल्लीच्या दृष्टीनंही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये नव्यानं पाच ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी केंद्रानं घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत डीआरडीओच्या मदतीनं शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये पाच PSA Oxygen plant सुरु करून रुग्णांना पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आला. 

Oxygen Plant : ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राकडून देशभरात उभारले जाणार 581 PSA प्लांट - नितीन गडकरी

डीआरडीओच्या सहाय्यानं मे महिन्यातील पहिला आठवडा संपण्याच्या पूर्वीच हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. 

पंतप्रधान निधीतून उभारणार ऑक्सिजन प्लांट 

500 हून अधिक ऑक्सिजन प्लांट देशभरा उभारण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीची मदत घेतली जाणार आहे. पुढील तीन महिन्यांच्या आत हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *