All rallies of Rahul Gandhis in West Bengal canceled due to corona situation | WB Election 2021


नवी दिल्ली : कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील त्यांच्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर इतर नेत्यांनाही मोठ्या जाहीर सभांच्या परिणामांबाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, “कोविडची परिस्थिती पाहता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व जाहीर सभा रद्द करत आहे. सद्य परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जनसभा घेण्याचे काय परिणाम आहेत याचा सखोल विचार करण्याचा मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देईन.” 

त्याआधी राहुल गांधी यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी आरोप केला होता की मोदींद्वारे निर्माण केलेला हा विध्वंस आहे. काही रुग्णालयांमध्ये बेड आणि व्हेंटिलेटर नसल्याच्या वृत्तानंतर राहुल गांधी यांनी गुरुवारपासून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “रुग्णालयात चाचण्या होत नाहीत, बेड नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, ऑक्सिजन नाही, लस नाही, पंतप्रधान केअर्स फक्त उत्सवाचं ढोंग आहे?Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *