ABP Majha Smart Bulletin For 22th November 2020 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 22 नोव्हेंबर 2020 | रविवार


देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

1. 2021मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर संपूर्ण पिढी बरबाद; यूनिसेफचा धक्कादायक रिपोर्ट, गंभीर परिणाम भोगावे लागण्याचाही इशारा

2.पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद, औरंगाबादमधल्या शाळांनाही 3 जानेवारीपर्यंत कुलूप, नाशिकमधल्या शाळांबाबत आज छगन भुजबळांच्या उपस्थितीत बैठक

3.मराठा क्रांती मोर्चाचा आज मराठा जोडो अभियानाचा अखेरचा टप्पा, वाशी ते कळव्यादरम्यान रॅलीचं आयोजन

4. पंधरा दिवसांसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करा, मुंबई महापौरांची मागणी; गरज पडल्यास मुंबई-दिल्ली ट्रेन, विमानसेवा स्थगितीचा पर्याय अस्लम शेख यांची माहिती

5. राष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवादाविरोधात कारवाई करताना गय करणार नाही, नगरकोटातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची पाकिस्तानला तंबी

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 नोव्हेंबर 2020 | रविवार | ABP Majha

6. बोगदा बनवून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा मोठा खुलासा

7. आता आयुर्वेदीत डॉक्टरांनाही सर्जरी करण्याची परवानगी, अभ्यासक्रमात शस्त्रक्रियांचा समावेश करणार, केंद्राची अधिसूचना प्रसिद्ध

8. जवळपास 320 कोटी रुपयांच्या 28 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी, राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय, रोजगारांची होणार निर्मिती

9. ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहला अटक, भारतीचा पती हर्षची अजूनही चौकशी सुरुच, मुंबईतील घराच्या छापेमारीत गांजा जप्त

10. वीरेंद्र सेहवागचं मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कचा लोकप्रिय शो ‘एक्स्ट्रा इनिंग्स’मध्ये सेहवाग दिसणार

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: