ABP Majha Smart Bulletin For 21st November 2020 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 21 नोव्हेंबर 2020 | शनिवार


देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

  1. कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपुरात संचारबंदी, 22 ते 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपुरात एसटी बंद राहणार; कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्णय

  1. उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार, निवडणूक आयोगाकडून नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास मान्यता

  1. मुंबई, ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार, मात्र नाशिकमधील शाळा सोमवारपासून सुरु करणार; गोंधळलेलं सरकार म्हणत प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

  1. राज्यात आदिवासी विकास विभागातील माध्यमिक वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांची माहिती

  1. कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, काल पंतप्रधान मोदींनी देशातील स्थितीचा आढावा; तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात लॉकडाऊनची तयारी

  1. महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार, वीज बिलांवरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

  1. सरकारमधील एका मंत्र्याने वीजबिल माफीची फाईल दाबली, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

  1. राज्यातील प्रमुख नद्यांवर वाळूमाफियांचा कब्जा, कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ल्याचं सत्र सुरु; अवैध वाळू उपसा माझाच्या कॅमेऱ्यात कैद

  1. पुढच्या वर्षी सिडकोची 60 हजार घरांची लॉटरी, CIDCO चे एमडी संजय मुखर्जी यांची माहिती

  1. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्या विरोधातलं ट्वीट महागात, अ‍ॅटर्नी जनरल यांची कुणाल कामराविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यास संमती

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *