ABP Majha Smart Bulletin For 1st January 2021 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 1 जानेवारी 2021 | शुक्रवार


देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

1. कोरोनाचं टेन्शन बाजूला ठेवून नव्या उमेदीसह नववर्षाचं स्वागत, एबीपी माझाच्या प्रक्षेकांसाठी घरबसल्या प्रसिद्ध मंदिरांमधून देवदर्शन

2. आज भारत सरकारकडून लसीला मान्यता मिळण्याची शक्यता, सीरम, भारत बायोटेक शर्यतीत

3. जागतिक आरोग्य संघटनेकडून फायझर लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळालेली पहिली लस

4. राज्यात 2 जानेवारीपासून चार जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणाचं ड्राय-रन; पुणे, नागपूर, जालना, नंदुरबारची निवड

5. कोरोनामुळे कोरेगाव भीमा विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन, शौर्यदिनानिमित्त अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 जानेवारी 2021 | शुक्रवार | ABP Majha

6. केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्लॅन नाही, प्रकाश आंबेडकरांची कोरेगाव भीमामध्ये टीका

7. कार्यालयात उशिरा येणाऱ्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना चाप, 6 वेळा उशिरा आल्यास दोन रजा, तर 9 वेळा उशीर झाल्यास 3 रजा गृहित धरणार

8. शेतकरी आंदोलनाचा 37वा दिवस, नव्या वर्षात तोडगा निघण्याची अपेक्षा; 4 जानेवारी रोजी सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा बैठक

9. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा 4 मेपासून, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा, तर 15 जुलै रोजी निकाल जाहीर होणार

10. जगभरात कोरोनाचा कहर सुरुच; सलग दुसऱ्या दिवशी 7 लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद, तर 13 हजार रुग्णांचा मृत्यू

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *