ABP Majha Smart Bulletin For 19th November 2020 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2020 | गुरुवार


देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

  1. मुंबई महापालिकेवर 2022मध्ये भगवाच फडकेल, पण भाजपचा, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास; अतुल भातखळांची आगामी निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती

  1. वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी, काँग्रेस मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना

  1. सरकार शब्दावरून फिरलं, हे विश्वासघातकी सरकार, वीज बिलावरून फडणवीसांची टीका; तर भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा नितीन राऊतांचा पलटवार

  1. वाढीव वीज बिलांवरुन, मनसे मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत, दुपारी महत्वाची बैठक; तर भाजप खासदार रक्षा खडसेंचाही रस्त्यावर उतरण्याचा इशारा

  1. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस, संपत्तीचं विवरण मागीतलं; नोटीशीला उत्तर देणार असल्याची चव्हाणांची माहिती

  1. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारांवर, तर 100 जणांचा मृत्यू

  1. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनावर कोरोनाचे सावट, चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन

  1. कल्याण-डोंबिवली मधील पत्री पुलाचा प्रश्न मार्गी लागणार; सर्वात लांब गर्डर उभारण्यासाठी चार दिवस मेगाब्लॉक

  1. अभिनेत्री कंगना रनौतला अटक करण्याच्या मुंबई पोलिसांच्या हालचाली, चौकशीला हजर न राहिल्यास रंगोलीलाही अटक होण्याची शक्यता

  1. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना न्यू साऊथ वेल्समध्ये हलवलं

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: