ABP Majha Smart Bulletin For 18th November 2020 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 18 नोव्हेंबर 2020 | बुधवार


देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

1. एसटीला पॅकेज मिळतं मग महावितरणला का नाही? वाढीव वीज बिलावरून फडणवीसांचा सवाल, बिलांची सक्तवसुली न करण्याचा राजू शेट्टींचा इशारा

2. पुणे पदवीधर निवडणुकीत जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला; अमरावतीत अनिल बोंडेंचा बहिणीला आशीर्वाद, मात्र भाजपचा प्रचार, विनायक मेटेंची बंडखोरीची भाषा

3. पंढरपुरात आजपासून दोन हजार भाविकांना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार, भक्तांचा वाढता प्रतिसाद पाहता मंदिर-संस्थांचा निर्णय

4. शिवसेनेचा गड हिरावण्यासाठी भाजपचं ‘मिशन मुंबई’; मुंबई महापालिका निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी आज कार्यकारणीची बैठक

5. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर छट पुजेला बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय; सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्याची भाजपची मागणी

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 नोव्हेंबर 2020 | बुधवार | ABP Majha

6. ॲाटो मोबाईल इंडस्ट्रीची कोरोनावर मात; आरटीओच्या तिजोरीत 2 हजार 768 कोटी रुपयांच्या महसुलाची भर

7. पुढच्या वर्षापर्यंत कोरोनासाठी नाकाद्वारे देण्यात येणारी लस बाजारात आणणार, भारत बायोटेकच्या व्यवस्थापकांची महत्त्वाची माहिती

8. पाकिस्तानच्या प्रशासनाकडून माणुसकीचं दर्शन, प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यानं विमानाचं एमर्जंन्सी लँडिंग करण्यास परवानगी

9. आयआरसीटीसीची प्रायव्हेट तेजस एक्सप्रेस बंद होणार; खासगी तेजस एक्सप्रेसच्या फेऱ्या बंद करण्याचे आयआरसीटीसीचे पत्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने निर्णय

10. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं मोठं आव्हान, खेळाडूंना न्यू साऊथ वेल्समध्ये हलवण्याची शक्यता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: