ABP Majha Smart Bulletin For 14th January 2021 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 14 जानेवारी 2021 | गुरुवार


देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

1. नवाब मलिकांचा जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक, भाजपकडून मलिकांच्या हकालपट्टीची मागणी, बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप आक्रमक

2. औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख करणाऱ्या सीएमओच्या ट्विटर हँडलवरुन उस्मानाबादचा धाराशीव असा उल्लेख, नामांतर महाविकास आघाडीचा अजेंडा नसल्याचं काँग्रेसकडून पुन्हा एकदा स्पष्ट

3. प्रत्येक जिल्ह्याला मिळणाऱ्या लसीच्या डोसाची यादी एबीपी माझाच्या हाती, 16 जानेवारीच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज

4. उद्या होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रचाराची मुंदत संपल्यानं छुप्या प्रचाराला वेग, कोविड पॉझिटिव्ह मतदारांसाठी विशिष्ट वेळ राखीव ठेवणार

5. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना आता ईडब्ल्यूएसचा लाभ; पोलीस भरती संदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जानेवारी 2021 | गुरुवार | ABP Majha

6. हिंगणघाट प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणी आई-वडिलांची साक्ष नोंद, आईला अश्रू अनावर

7. भारत पाकिस्तान सीमेवर 150 मीटर लांब बोगदा, भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला

8. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, महाभियोग चालवण्यास कनिष्ठ सभागृहात प्रस्ताव मंजूर

9. कोरोनाच्या महामारीच्या उत्पत्तीचं कारण शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना चीन दौऱ्यावर, वुहानमध्ये 2019 डिसेंबरमध्ये सापडला होता कोरोनाचा पहिला रुग्ण

10. आधी पत्नीला मिठी मारली, मग धावत्या लोकल ट्रेनमध्ये ढकलून दिलं; मुंबईतील धक्कादायक घटना

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *