ABP Majha Smart Bulletin For 10th January 2021 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 10 जानेवारी 2021 | रविवार


देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

1. 16 जानेवारीपासून भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात, लसीच्या पुरवठ्यासाठी लवकरच सीरमसोबत कंत्राट करणार

2. भंडाऱ्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलमधील शिशूकेअर कक्षात फायर अलार्म आणि पाण्याची सोयच नव्हती, प्रत्यक्षदर्शींचा आरोप; लेकरं गमावलेल्या पालकांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री भंडाऱ्यात

3. गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठल मंदिराने फायर ऑडिटच केले नाही, हजारो भाविकांच्या जीवाशी खेळ

4. सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वरांच्या यात्रेवर निर्बंध, सर्वसामान्यांसाठी मंदिर बंद

5. ममता बॅनर्जींचं सरकार आल्यानंतर बंगालमध्ये अलकायदानं हातपाय पसरले; विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचा गंभीर आरोप, अमित शहांना अहवाल सुपूर्द

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जानेवारी 2021 | रविवार | ABP Majha

6. जगभरात गेल्या 24 तासांत 6 लाख 79 हजार नवे कोरोना रूग्ण, तर 11 हजार लोकांचा मृत्यू; आतापर्यंत 9 कोटी लोकांना कोरोनाची लागण

7. काल संपूर्ण पाकिस्तान अंधारात, बत्ती गुल झाल्यानं ब्लॅकआऊट, जागतिक स्तरावर इमरान खान सरकारची नाचक्की

8. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेकडून गुजराती मेळाव्याचं आयोजन, अनेक गुजराती व्यावसायिक हातावर शिवबंधन बांधणार

9. मुंबई महापालिकेचा 1600 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 50 करबुडव्यांची यादी उघड, थकबाकीदारांमध्ये अनेक सरकारी कार्यालयं, बिल्डर्स, हॉस्पिटल्सचा समावेश

10. लाबुशेन आणि स्मिथच्या शतकी भागीदारीनंतर ऑस्ट्रेलियाची वाटचाल मोठ्या आघाडीच्या दिशेनं, टीम इंडिया अडचणीत

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *