1st to 8th class exams: सरकारचा निर्णय धाब्यावर बसवून शाळा घेताहेत परीक्षा – schools are conducting online exams of 1st to 8th class in spite of government decision to promote students


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करता त्यांना सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय झाल्यानंतरही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. याबाबत पालकांनी आक्षेप नोंदविल्यावर आम्हाला अद्याप लेखी आदेश मिळाला नसल्याचे शाळांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शिक्षणमंत्र्यांची घोषणा करूनही शाळा लेखी आदेशाशिवाय ऐकत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वकष मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येतो. त्यानुसार वर्षभरात विद्यार्थ्यांच्या दोन चाचण्या घेण्यासोबतच दोन संकलित मूल्यमापन करण्यात येते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट जोडणीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांत या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा घोषित करावा, असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करता त्यांना वर्गोन्नतीचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.

याबाबत गायकवाड यांनी सोशल मीडियावर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचे आदेशही दिले. मात्र, या आदेशाकडे नामांकित खासगी शाळांच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या शाळांकडून परीक्षा घेण्यात येत आहे. गायकवाड यांनी परीक्षा न घेण्याचे जाहीर केल्यानंतरही शाळांकडून परीक्षा घेण्यासोबतच निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहेत. त्यातच करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांची परीक्षा देण्याबाबत मानसिकता नाही. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून करण्यात आली आहे.

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

शाळांनी अंमलबजावणी करावी
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील शाळांनी करायची आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्तीसाठी ऑनलाइन मार्गदर्शन

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच; कठोर निर्बंधांच्या

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *