155 People Infected With Corona In A Single Village In Buldhana, Infected Through A Religious Event


बुलडाणा : कोरोनाचे नियम न पाळल्यास काय होऊ शकतं, याचं मोठं उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात समोर आलं आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोट्याशा गावात 155 कोरोनाची लागण धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवासांपूर्वी सात दिवासांच्या धार्मिक कार्यक्रमाचं गावात येथील गावकऱ्यांनी आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातून कोरोनाच संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या कार्यक्रमाला गावकऱ्यांसहित बाहेरगावहून काही मंडळी सामिल झाली होती. मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्यामुळे गावात संसर्ग पसरला आणि बघता बघता छोट्याशा गावात 155 जणांना कोरोना झाला. आता गावाला प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून, गावात आरोग्य पथक, महसूल व पोलिस कर्मचारी कामाला लागले आहेत. गावातील प्रत्येकाची टेस्ट करण्यात येत आहे.

गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे आता अजुन किती जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र नागरिकांनी कोरोना गेला असं समजून काळजी न घेतल्याने अख्ख गावच संकटात सापडलं आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *