10th result 2021: दहावीसाठी पर्यायी परीक्षेचाच पर्याय? – maharashtra board ssc exam, 10th exam evaluation process yet to decide


हायलाइट्स:

  • दहावीसाठी पर्यायी परीक्षेचाच पर्याय?
  • सीबीएसई अंतर्गत मूल्यमापनाचा आधार घेत लावणार दहावीचा अंतिम निकाल
  • मात्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे अधिकृत अंतर्गत मूल्यमापन नाही

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) आधारावरच राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. आता सीबीएसईने दहावीची मूल्यांकन पद्धत जाहीर केल्याने राज्य सरकार नेमके काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातत्यपूर्ण मूल्यमापनाची कोणतीही व्यवस्था नसलेल्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात सध्या तरी परीक्षा हाच पर्याय समोर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांचे कशाच्या आधारे मूल्यांकन करणार, त्यांना दहावीची गुणपत्रिका मिळणार की नाही आदी अनेक प्रश्न समोर उभे राहात आहेत. यातच दहावीसाठी एखादी परीक्षा हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सीबीएसईने वर्षभर पार पडलेल्या अंतर्गत मूल्यमापनाचा आधार घेत अंतिम निकाल जाहीर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे अधिकृत अंतर्गत मूल्यमापन झालेले नाही. यामुळे मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अशा कोणत्याही प्रकारे मूल्यमापन करून निकाल लावणे अवघड आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत दहावीच्या गुणांना विविध स्तरावर महत्त्व आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण मिळणे आवश्यकच असल्याचे मत मंडळाच्या माजी सचिव बसंती रॉय यांनी मांडले. सद्यस्थितीत संपूर्ण परीक्षा घेणे शक्य नाही. याला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांची सर्व विषयांचा समावेश असलेली सार्वत्रिक एकच परीक्षा घ्यावी. म्हणजे विद्यार्थी एकाच दिवशी शाळेत जाऊन ३ तास ही परीक्षा देऊ शकतील. ही प्रश्नपत्रिका सर्व विषयांचा समावेश व समान मूल्यभार असलेली असू शकते असा पर्यायही त्यांनी सुचविला. शिष्यवृत्ती परीक्षा ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीनेच या परीक्षेचे आयोजन करता येऊ शकते असेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांचे गुण मागवावेत

बहुतांश शाळांमध्ये दहावीच्या शिक्षकांनी अंतर्गत परीक्षा घेतल्या आहेत. त्या परीक्षांच्या आधारे एक सूत्र देऊन मंडळाने शाळांकडून विद्यार्थ्यांचे गुण मागवावे असे मत घाटकोपर येथील के. व्ही. के. सार्वजिनक हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांनी व्यक्त केले. शाळांनी निकाल जाहीर करताना काही गडबड होऊ नये यासाठी त्यांच्या मागच्या ३ वर्षांच्या निकालाचा अभ्यास करून यंदाचा निकाल जाहीर झाला आहे का हेही मंडळाला तपासता येणे शक्य होणार आहे. याबाबत शाळांना स्वायत्तता देऊन मंडळाने मूल्यांकन प्रक्रियेची मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात असेही ते म्हणाले.
CBSE दहावी निकाल कधी आणि कसा लागणार; बोर्डाने केलं जाहीर

CBSE बोर्डाची बारावी परीक्षेसाठी क्वेश्चन बँक जारी

शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; १ मे ते १३ जून शाळा राहणार बंद

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *