10th 12th exam 2021 : ‘बोर्डाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक द्या’ – 10th 12th exam 2021 students should get big question bank parliamentary panel suggession


Board Exam 2021 Question Bank: सीबीएसई (CBSE) सह अनेक राज्यांनी बोर्ड परीक्षा २०२१ ची घोषणा केली आहे. अनेक बोर्डांनी तर विस्तृत वेळापत्रक (Board Exam Datesheet) देखील जारी केले आहे. लाखो विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. यात आता प्रश्नपत्रिकेशी संबंधित प्रश्न उपस्थित होत आहेत.

करोना व्हायरस महामारीमुळे (Corona Virus) २०२० साली संपूर्ण शाळा बंद होत्या. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. पण तांत्रिक अडचणींमुळे या सुविधेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना एकसमान झालेला नाही. यामुळे एक शैक्षणिक दरी निर्माण झाली आहे. या संबंधी सरकारी अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाइल, लॅपटॉप सुविधेतील उणीवांमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की एकसमान शिक्षण झाले नाही तर परीक्षा एकसमान कशी घेतली जाऊ शकते?

या संबंधी संसदीय समितीने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला (Education Ministry) एक शिफारस केली आहे. समितीचे अध्यक्ष व भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे (MP Vinay Sahasrabuddhe) यांनी मंत्रालयाला एक ‘बिग क्वेश्चन बॅंक’ (Big Question Bank) तयार करण्याचा सल्ला दिला आहे.


लिखाणाचा सरावच सुटला; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे समस्या

त्यांनी म्हटलंय की दहावी आणि बारावीच्या सर्व विषयांसाठी प्रश्नांची एक बँक तयार करावी, यात ठरलेला संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर व्हावा. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत योग्य वेळेपर्यंत ही बँक पोहोचवावी. यानंतर बोर्ड परीक्षांमध्ये यात प्रश्नांमधून प्रश्न विचारले जावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची समान संधी मिळेल.

तूर्त तरी शिक्षण मंत्रालयाकडून यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhriyal) यांनी काही दिवसांपूर्वीच बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची (CBSE Board Exam Date 2021) घोषणा केली होती. तपशीलवार वेळापत्रक (CBSE Datesheet 2021) या महिन्यात जारी केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेची शाळांना ऑफलाइन परीक्षा घेण्याची परवानगीAuthor: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *