स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोफत करोना चाचणी करण्याची मागणीम. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत करोना चाचणी करावी; तसेच या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची मोफत करोना चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देण्यात आले.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर निर्माण होत आहे. पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी येतात. करोनाच्या या महाभयंकर संकटात या विद्यार्थ्यांची परीक्षा होत नसल्याने त्यांना शहरात अडकून पडावे लागले आहे. आधीच सरकारी पातळीवर असणारी उदासीनता आणि त्यात बेरोजगारी यामुळे या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बेताची झाली आहे. अशात यातील काही विद्यार्थ्यांना करोनाची लक्षणे दिसत आहे. आर्थिक अडचणी आणि करोनावरील उपचारांचा खर्च यामुळे हे विद्यार्थी चाचणी करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची मोफत करोना चाचणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे हातबल असणारे हे तरुण चाचणी न करता आपल्या राहत्या ठिकाणी अडकून आहेत. यातील अनेक तरुणांना त्रास जाणवत असून, त्यांची चाचणी होणे गरजेचे आहे. हे सर्व तरुण मध्यवर्ती पुण्यात वास्तव्यास आहेत. ही सर्व ठिकाणे प्रचंड रहदारीची आणि गर्दीची ठिकाणे आहेत. त्यामुळे या तरुणांना जर प्रादुर्भाव झाला असेल, तर दुर्दैवाने हे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे या तरुणांची कोविड चाचणी होणे गरचेचे आहे, असे यादव यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदभरती परीक्षांसोबत इतर परीक्षा आगामी काळात होणार आहे. सुरक्षितता म्हणून परीक्षार्थी आणि परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी एमपीएससी स्टुडन्ट राइट्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *